Home संगमनेर संगमनेर भांडणात मध्यस्थी केल्याने कुटुंबीयास मारहाण

संगमनेर भांडणात मध्यस्थी केल्याने कुटुंबीयास मारहाण

Sangamner Family members beaten for mediating

संगमनेर | Sangamner: तालुक्यातील निमज येथे शेतबांधावरून मध्यस्ती केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बाबूने बेदम मारहाण केली. हि घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १४ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोपट कासार हे मुलीला घरी घेऊन जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून शेतबांधाच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यांना जबर मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी, आई व मुलीला मारहाण करण्यात आली. पोपट कासार हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोपट कासार यांनी बुधवारी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून गुलशन भरत कातोरे, कुसुम गुलशन कातोरे, विलास बच्छाव कासार, शकुंतला बच्छाव कासार. मीना विलास कासार, बच्छाव विलास कासार, बाळू उत्तम दिघे त्यांचा मुलगा व अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner Family members beaten for mediating

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here