Home संगमनेर संगमनेर शहरात तरुणीचा विनयभंग, सासूलाही मारहाण

संगमनेर शहरात तरुणीचा विनयभंग, सासूलाही मारहाण

Molestation of a young woman in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात राहणारी एक १९ वर्षाची विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विवाहित तरुणी घरात एकटी असताना तेथे नात्यातील आरोपी दातीर बाबामिया शेख, समीर दातीर शेख, अशोक शौकत शेख, मलेखा रमजान पठाण सर्व रा. मदिरानगर संगमनेर हे आले व त्यांनी तरुणीला तुझी सासू व पती हे आम्हाला तुम्ही रहात असलेली जमीन देत नाही असे म्हणून तुझ्याकडे पाहतो अशी धमकी दिली. तसेच अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पना होईल असे वर्तन करून विनयभंग केला.

डोक्यात काठी व गज मारला व जीवे मारण्याची धमकी दिली. सासू सोडविण्यास गेली असता त्यानाही मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी विवाहित तरुणीने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून नातेवाईक असलेले आरोपी दातीर बाबामिया शेख, समीर दातीर शेख, अशोक शौकत शेख, मलेखा रमजान पठाण यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Molestation of a young woman in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here