Home अहमदनगर बांधावरील गवत पेटविल्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली

बांधावरील गवत पेटविल्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली

Nevasa woman was hit in the head with an ax

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील चंदा शिवारात सामाईक शेतीच्या बांधावरील गवत व काट्या पेटविल्याच्या रागातून शेतकरी महिलेस पाच जणांनी शिवीगाळ करून डोक्यात कुऱ्हाड मारून डोके फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना काल १०:३० वाजेच्या सुमारास घडली.

छाया बाबसाहेब रासकर वय ४० रा. चांदा या महिलेस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच या महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने ही महिला जखमी झाली आहे.

या शेतकरी महिलेने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मारहाण करणारे आरोपी सुमनबाई साहेबराव रासकर ,संदीप रावसाहेब रासकर, सुभाष साहेबराव रासकर, साहेबराव रामभाऊ रासकर, रावसाहेब रामभाऊ रासकर सर्व रा. चांदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहे.

Web Title: Nevasa woman was hit in the head with an ax

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here