Home Akole News Bhandardara Dam: भंडारदरा धरण ६० टक्के भरले  

Bhandardara Dam: भंडारदरा धरण ६० टक्के भरले  

Bhandardara Dam 60 percent Full

अकोले | Bhandardara Dam: नगर जिल्ह्यातील जीवनदायी भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे

भंडारदरातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर आला आहे. मुळा धरणात आवक चांगली होत असल्याने हे धरण 44 टक्के भरले आहे. वाकी, शिरपुंजे तलावही तुडूंब झाले आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचा पाउस वाढला आहे. गत दोन दिवसांपासून तर तांडव नृत्य सुरू आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची विक्रमी आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात मंगळवारी सायंकाळी 5275 दलघफू पाणीसाठा होता. त्यानंतरच्या 24 तासांत तब्बल 521 दलघफू पाणी दाखल झाल्याने बुधवारी सायंकाळी हा पाणीसाठा 5796 दलघफू झाला होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत या धरणात 653 दलघफू पाणी आले. त्यामुळे रात्री धरणातील साठा 6612 दलघफूवर (60 टक्के) पोहचला होता. गुरूवारीही भंडारदरात पाऊस सुरू होता. पण बुधवारच्या तुलनेत काहीसे प्रमाण कमी होते. पावसाचे प्रमाणत तुलनेत कमी झाले आहे. 

Web Title: Bhandardara Dam 60 percent Full

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here