Home अकोले भंडारदरा धरण इतके  टक्के भरले- Bhandardara Dam Update

भंडारदरा धरण इतके  टक्के भरले- Bhandardara Dam Update

Bhandardara Dam Update:  भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने गत 12 तासांत 105 दुलघफू पाणी नव्याने दाखल.

Bhandardara Dam  is so full

भंडारदरा:  भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने गत 12 तासांत 105 दुलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यापैकी 35 दलघफू पाण्याचा वापर झाला. 70 दलघफू साठ्यात वाढ झाली. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7653 दलघफू (69.33टक्के) झाला होता. रात्री उशीरा पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचला होता.

चार-पाच दिवसांपासून पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने अधूनमधून सरी कोसळत आहेत. मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे वाढले. डोंगररांगा धुक्याने झाकाळून गेल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे घाटघर व रतनवाडीत धुण्या पेटल्या आहेत. काल दिवसभर भंडारदरात 23 मिमी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणात 91 दलघफू पाणी आले. पाणीसाठा 2668 (32 टक्के) दलघफू झाला होता.

मुळा पाणलोटातही संततधार सुरू असल्याने धरणाकडे नवीन पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 266 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने काल सकाळी धरणातील पाणीसाठा 11002 दलघफू (42.31) झाला होता. तर कोतूळ येथे 7 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी येथील मुळेचा विसर्ग 2984 क्युसेकने सुरू होता.

गत 24 तासांत झालेला पाऊस मिमी- भंडारदरा 35, घाटघर 40, रतनवाडी 59, वाकी 23.

Web Title: Bhandardara Dam  is so full

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here