Home क्राईम संगमनेरात पोलिसांच्या अंगावर चार चाकी गाडी घालण्याचा प्रयत्न

संगमनेरात पोलिसांच्या अंगावर चार चाकी गाडी घालण्याचा प्रयत्न

Sangamner Crime: संगमनेर शहरात नाकाबंदी करणार्‍या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना.

attempt to run a four-wheeler on the police in Sangamner Crime filed

संगमनेर:  नाशिक- पुणे महामार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोर नाकाबंदी करणार्‍या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश दत्तात्रय इटप (रा. मालदाड रोड, संगमनेर) हा सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह कार मधून (क्रमांक एम.एच.19 सी. आर. 3385) संगमनेरच्या दिशेने येत होता.

शासकीय विश्रामगृह समोर शहर पोलीस वाहन तपासासाठी उभे होते. इटप हा वेगाने गाडी चालवत असल्याने नाकाबंदी पॉईंट वरील पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्याने गाडी न थांबवता गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तो पळून जात असताना समोरील ब्रिझा गाडी (क्र. एम एच 22. बी. एच. 2512) हिला धडक दिली. पोलिसांनी अडवले असता त्याने उपस्थित पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सतिष इटप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: attempt to run a four-wheeler on the police in Sangamner Crime filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here