अभियंत्याने हॉटेलमध्ये नेऊन विवाहित महिलेवर बलात्कार
एका अभियंत्याने विवाहित महिलेला इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना.
नागपूर : एका खासगी कंपनीतील एका अभियंत्याने विवाहित महिलेला इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल देशपांडे (४४, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित ३४ वर्षीय महिला उच्चशिक्षित असून ती विवाहित आहे. तिला पती आणि एक मुलगा आहे. ती पूर्वी अहमदाबाद आणि मेरठ येथील एका मोठ्या कंपनीत नोकरीवर होती. ती मूळची नागपूरची असून सध्या ती ‘वर्क फ्रॉम होम’ तत्वावर कंपनीत नोकरी करते. आरोपी विशाल देशपांडे हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. त्याने इंस्टाग्रामवरून विवाहित महिलेला मॅसेज केला. त्याने तिच्याशी ओळखी वाढवून मैत्री केली. तो विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे तिला सांगत होता.
त्यामुळे ती त्याच्या जाळ्यात अडकली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने पतीला घटस्फोट देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे महिलेने पतीला प्रेमप्रकरणाची माहिती दिली. मुलाला घेऊन ती नागपुरात आली. ६ मे रोजी दोघांची बेलतरोडीमध्ये भेट झाली. काही दिवस सोबत फिरल्यानंतर त्याने महिलेला हॉटेलमध्ये नेले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने लग्न करण्यासाठी तयारी केली.
मात्र, देशपांडे हा लग्नास टाळाटाळ करीत होता. काही दिवसानंतर महिलेला देशपांडे हा विवाहित असल्याची माहिती मिळाली. तिने विवाहित असल्याबाबत जाब विचारला. त्याने विवाहित असल्याची कबुली दिली. त्यानंतर लग्न करण्यास अमर्थता दाखविली. पिडीत महिलेने बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Engineer took married woman to hotel and rape her
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App