Home Accident News मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर जीपचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर जीपचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

नाशिक महामार्गावर कंटेनर जीपचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात  सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी.

accident of container jeep on Mumbai Nashik highway, six dead

मुंबई: नाशिक महामार्गावर कंटेनर जीपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात  सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  पडघा नजीकच्या खडवली फाटा या धोकादायक वळणावर मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पडघा व परिसरातील असंख्य विद्यार्थी, चाकरमानी, रेल्वेने कल्याण ठाणे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी खडवली रेल्वे स्टेशन येथे जात असतात. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास MH 04 E 1771 ही काळी पिवळी जीप प्रवासी घेऊन जात होती.  जीप खडवलीकडे जात असताना त्याच सुमारास कंटेनर क्रमांक MH 48 T 7532 हा मुंबईच्या दिशेने भरधाव येत होता. कंटेनरने जीपला जोरदार ठोकर दिली. त्यानंतर कंटेनरने जीपला अक्षरशः फरफटत शेतात लोटून दिले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये विद्यार्थी असलेल्या चिन्मयी विकास शिंदे वय 15, रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे वय  27, संतोष अनंत जाधव वय 50, वसंत धर्मा जाधव वय 50 आणि प्रज्वल शंकर फिरके वय 18 यांचा मृत्यू झाला आहे.  या अपघातात दिलीप कुमार विश्वकर्मा वय 29,  चेतना गणेश जसे वय 19, कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय  22, जान्हवी संजय वाळंज आणि वाहन चालक जावेद अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीत  खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे. शिवशंकर जंगीलाला प्रजापती यास पडघा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे कंटनेर व जीप यांच्यात आज पहाटे दुर्देवी अपघात झाला आहे. ही दुर्घटना अतिशय वेदनादायी आहे. पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर व काळी पिवळी जीप यांच्यात झालेल्या अपघातात ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना तात्काळ यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. – एकनाथ शिंदे.

Web Title: accident of container jeep on Mumbai Nashik highway, six dead

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here