मेव्हणीसोबत संबंध तोडायला सांगत होता, मात्र तो ऐकत नव्हता अखेर…
प्रेम संबंध संपविण्यासाठी आग्रह मात्र न ऐकल्याने अखेर प्रियकराचा काटा (Murder) काढला.
नांदेड: प्रेमप्रकरणाच्या वादातून भावोजीने मेव्हणीच्या प्रियकराची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना जुन्या नांदेडमध्ये रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घडली. किरण माने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शिवा माने असे आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जुन्या नांदेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, किरण मानेचे शिवा मानेच्या मेहुणीशी प्रेमसंबंध सुरु होते. हे संबंध शिवाला मान्य नव्हते. शिवा वारंवार हे संबंध संपवण्यासाठी किरणला सांगत होता. या कारणातून अनेकदा किरण माने आणि शिवा माने यांच्यात वाद झाले. मात्र किरण प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता. यामुळे किरणला संताप अनावर झाला. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने किरणचा कायमचा काटा काढण्याचा काढला.
मुख्य आरोपी शिवा माने, सुभाष माने आणि अन्य आरोपींनी काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास किरण मानेला गाठत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात किरण मानेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
Web Title: Murder Case asking him to break up with his sister-in-law, but he was not listening
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App