Home पुणे भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग……..मनोज जरांगे पाटील

भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग……..मनोज जरांगे पाटील

Breaking News | Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. (Manoj Jarange Patil).

Bhujbal should just stand, then........ Manoj Jarange Patil

पिंपरी : मराठा समाजाने राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी देहूत पत्रकारांशी बोलताना केले.

मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. आता जरांगेंनी भुजबळांना लोकसभेच्या उमेदवारीवरून इशारा दिला आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मनोज जरांगे पाटील देहूत आले होते. त्यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना खुले आव्हान दिले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशाराच जरांगेनी भुजबळांना दिला आहे. भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका. त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, मनोज जरांगेंनी म्हटले आहे.

जरांगे आज नाशिक दौऱ्यावर

दरम्यान, नाशिकमधून छगनभुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच मनोज जरांगे पाटील आज (सोमवारी) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे नाशिक राजकीय वातावरण तापणार असून मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये काय बोलणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bhujbal should just stand, then…….. Manoj Jarange Patil

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here