Home संगमनेर संगमनेर: नऊ वर्षांपासूनचा फरार आरोपी गजाआड

संगमनेर: नऊ वर्षांपासूनचा फरार आरोपी गजाआड

Breaking News | Sangamner: चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पकडून जेरबंद केले.

Nine years absconding accused Gajaad

संगमनेर: चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पकडून जेरबंद केले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोकॉ. हरिश्चंद्र बांडे, शिरसाठ, आत्माराम पवार, कुन्हे यांचे पथक फरार आरोपीचा शोध घेत होते.

त्यांना मागील नऊ वर्षांपासून शहर पोलिसांत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रशांत बाळासाहेब खरात (वय २८, रा. कौठे बुद्रुक, ता. संगमनेर) हा घारगाव पोलिसांच्या हद्दीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून मोठ्या शिताफीने त्यास पकडले. आजपर्यंत तो पोलिसांना अस्तित्व लपवून गुंगारा देत होता. अखेरीस त्याला पकडून गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Web Title: Nine years absconding accused Gajaad

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here