Home संगमनेर संगमनेर: शेळ्यांना वाचवायला गेला अन तरुणावर बिबट्याचा हल्ला

संगमनेर: शेळ्यांना वाचवायला गेला अन तरुणावर बिबट्याचा हल्ला

Sangamner News:  बिबट्याच्या हल्ल्यात (Attack) शेळी ठार झाली असून तरुण जखमी झाला आहे.

Bibatya attack a young man who went to save the goats

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी शिवारातील सांगडेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली असून तरुण जखमी झाला आहे.  बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्याने शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावरही बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कैलास शंकर सांगडे (वय-३९. रा. सांगडेवाडी, कुरकुंडी, ता. संगमनेर) हा तरुण जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. ०३) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास दत्तू वायळ हे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील शेळ्यांवर हल्ला केला. यातील एक शेळी बिबट्‌याच्या तावडीत सापडली. वायळ यांनी आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या कैलास सांगडे या तरुणाने शेळ्यांच्या कळपाकडे धाव घेतली. बिबट्याने पकडलेल्या शेळीला व इतर शेळ्यांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सांगडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.

Web Title: Bibatya attack a young man who went to save the goats

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here