Home क्राईम संगमनेर: मित्रानेच केला मित्राचा घात, चाकूने हल्ला

संगमनेर: मित्रानेच केला मित्राचा घात, चाकूने हल्ला

Sangamner Crime:  उसनवारीच्या पैशांवरून मित्रानेच मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना.

Sangamner A friend's friend's attack, knife attack

संगमनेर: संगमनेर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत होताना दिसून येत आहे. अशातच संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील खंडोबा मंदिराजवळ पैशाच्या वादातून चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.  उसनवारीच्या पैशांवरून मित्रानेच मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. ३) रात्री ८:०० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

गोरक्ष विठ्ठल वाकळे (रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला केलेल्या त्याच्या मित्राचे नाव रॉकी भाऊसाहेब जाधव (रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर) असे आहे. त्याच्याविरोधात किरण पंडित सपकाळ (रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कोठे बुद्रुक येथील खंडोबा मंदिराजवळ रस्त्यालगत गोरक्ष वाकळे व रॉकी जाधव या दोघा मित्रांमध्ये उसनवारीच्या पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन जाधव याने वाकळे याला शिविगाळ सुरू केली, त्याच्यावर चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात वाकळे गंभीर जखमी झाला.

याबाबत माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक उमेश पतंगे हे पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाकळे याला रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या जाधव याचा पोलिसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.

Web Title: Sangamner A friend’s friend’s attack, knife attack

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here