Home Accident News संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अकोलेतील दुचाकीस्वार ठार

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अकोलेतील दुचाकीस्वार ठार

Ahmednagar Sangamner Accident:  माहूली घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना.

Bike rider from Akole killed in Accident with unknown vehicle on Pune Nashik highway

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहूली घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक  २८ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम काशिनाथ जाधव राहणार समशेरपूर ता अकोले हे त्यांच्या दुचाकी क्रमांक (एम एच१७ सी डी २६२३) हिच्यावरुन आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात होते मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान ते माहूली घाट परीसरात आले असता भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात जाधव हे जागीच ठार झाले.

घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, हवालदार मनेष शिंदे ,नंदकुमार बर्डे,अरविंद गिरी, यांसह आदिंनी घटनास्थळी  धाव घेतली व मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title: Bike rider from Akole killed in Accident with unknown vehicle on Pune Nashik highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here