Home औरंगाबाद दहावीच्या वर्गातील मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

दहावीच्या वर्गातील मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

अपहरण झालेल्या दहावीच्या वर्गातील मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead body) वैजापूर तालुक्यातील भिवगाव शिवारात आढळुन आल्याने खळबळ.

finding the decomposed Dead body of a 10th class boy

वैजापूर: वैजापूर तालुक्यातील काही दिवसांपुर्वी अपहरण झालेल्या दहावीच्या वर्गातील मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी वैजापूर तालुक्यातील भिवगाव शिवारात आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. शाळेतील एका मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या घरच्यांनी त्याचा घात केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी मुलीचे वडील व काका या दोघांना ताब्यात घेतले असुन चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, सचिन प्रभाकर काळे (वय 16) असे मयत मुलाचे नाव असुन तो विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपुर्वी अपहरण झाल्याने वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी भिवगाव शिवारात गट क्रमांक 231 मध्ये भास्कर माधव गायके यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेतील मुलाचा मृतदेह आढळुन आला.

तो मृतदेह अपहरण झालेल्या सचिन काळेचा असल्याची खात्री पटली. पोलिस उप अधिक्षक महक स्वामी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीचे वडील व काका या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलाचा खुन झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली असुन हा खुन नेमका कुणी केला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Web Title: finding the decomposed Dead body of a 10th class boy

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here