अहिल्यानगर: गाठोड्यात आढळलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली
Ahilyanagar Breaking News: सहा दिवसांनी त्या मृतदेहाची ओळख.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रात गाठोड्यात आढळलेल्या मृत मुलाची ओळख पटवण्यात पोलीसांना तब्बल सहा दिवसांनी यश आले आहे. कार्तिक ज्ञानेश्वर बदादे (वय ४) असे त्याचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील साकुरेमिग गावचा रहिवासी आहे.
अज्ञात बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (दि. २० डिसेंबर) सायंकाळी उघडकीस आली होती. मृत बालक कोण? कुठला? त्याचा खून कोणी व कोणत्या कारणाने केला? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी आणि गुन्हे शाखेचे पथक सहा दिवसांपासून परिसर पिंजून काढत होते.
Web Title: body found in the pile was identified
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News