प्रियकराची आत्महत्येची धमकी; घाबरलेल्या तरुणीची लॉजमध्ये आत्महत्या
Pune Crime: विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे: विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अक्षय अरुण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ वर्षीय तरुणी कोंढवा भागात राहायला होती. तिचे आरोपी अक्षयशी प्रेमसंबंध होते. अक्षय तिला विवाहासाठी धमकावत होता. माझ्याशी विवाह न केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने तिला दिली होती.
आरोपी अक्षयने मोबाइलवर विषारी औषध पिऊन आत्महत्या करत असल्याची ध्वनिचित्रफीत पाठविली होती. त्यानंतर तरुणी घाबरली. अक्षयने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होईल, अशी धमकी तरुणीला दिली होती. सासवड रस्त्यावरील वडकी भागात एका लाॅजमध्ये तरुणीने खोली घेतली. तिने लाॅजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लाॅज व्यवस्थापकाने लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.
Web Title: boyfriend’s suicide threat Frightened young woman commits suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App