Home अकोले अकोले: ध्येय लढ़ा महिला संघटना आयोजित गुणगौरव सोहळा संपन्न

अकोले: ध्येय लढ़ा महिला संघटना आयोजित गुणगौरव सोहळा संपन्न

अकोले (प्रतिनिधी): ध्येय लढ़ा महिला संघटना,अकोले येथे नुकताच दहावी व् बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा एडीसीसी बँक सभागृह अकोले येथे  संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पुरग्रस्तांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने झाली.या  कार्यक्रमाचे प्रायोजक अकोले तालुका  वकील संघाच्या तालुका अध्यक्षा ऍड. पुष्पाताई  वाकचौरे यांनी केले. गेली १५ वर्षांपासून सामाजिक चळवळीत काम करणारे संस्थापक लहानु सदगीर  यांच्या सहकार्याने या संघटनेची स्थापना झाली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली  सदर कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थाना येणारा ताण तणाव याबद्दल अधिक माहिती सांगून त्याचे व्यवस्थापन कसे करावे,कसे वागावे ,मोबाईलचा अतिरेक वापराबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच महिलांसाठी अनेक मार्गदर्शनपर टिप्सही दिल्या.तसेच इतक्या ग्रामीण भागात ध्येयलढा संघटना महिला ,विद्यार्थी ,युवा, शेतकरी यांच्या साठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे .त्याबद्दल अभिनंदन केले .अकोले वकील संघाच्या अध्यक्ष ऍड .पुष्पाताई वाकचौरे यांनी अनेक कायदेशीर बाबी यावर महिलांसाठी सखोल मार्गदर्शन केले.
संघटनेचे संस्था पक अध्यक्ष  लहानु सदगीर यांनी  आपल्या कार्याचा प्रवास प्रेरणात्मक् विद्यार्थसमोर व्यक्त केला. ध्येयलढा महिला  संघटनेच्या अध्यक्षा सौ.दिलशाद सय्यद यांनी अकोले तालुक्यात संघटना स्थापन्या मागचा उद्देश सांगून अकोल्यात महिलांसाठी एक खुले व्यासपीठ देण्याचे व् या माध्यमातून अनेक भरीव सामाजिक व् शैक्षणिक कार्य पुढे करणार असल्याचे सांगितले.अकोले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनिल शिंदे सर व् मॉडर्न हायस्कूलचे प्राचार्य संतोष  कचरे सर यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रम स्तुत्य असल्याचे व्यक्त केले.गौरवप्राप्त विद्यार्थी व् पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी एडीसीसी बँकेचे तालुका विकास प्रमुख श्री. संतोषजी कोटकर  व् शाखाधिकारी श्री. मिलिंद नवले  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ.दिलशाद सय्यद यांनी केले असुन सूत्रसंचलन रेखा गायकवाड़ व् स्वप्नजा पतंगे यांनी केले. अध्यक्षीय सुचना व् अनुमोदन प्रतिभा साबळे व् अर्चना राहुरकर यांनी केले .आभार उपाध्यक्ष निता मूंदड़ा यांनी मानले. 
या कार्यक्रमासाठी ध्येय करिअर अकाडमीचे सर्व विद्यार्थी व् अकोले शाखा व्यवस्थापक गोरक्ष सदगीर ,नवनाथ होलगीर  उपस्थित होते. होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सुधाताई देशपांडे,पुष्पाताई वाणी, खाजिनदार अर्चना राहुरकर, सुनिता राठी,सचिव उज्ज्वला फरगड़े ,मंदाकिनी फोपसे ,नेहा ताजणे,वैशाली पाटेकर , मंगल कार्णिक ,रूपा कोळपक्रर, मंजू सारड़ा,  दिलशाद शेख,सुनिता शिंदे, मुक्ता रत्नपारखी,आदींसह ध्येयलढा महिला संघटनेच्या सदस्य महिलांनी परिश्रम घेतले. तसेच प्रेस फोटोग्राफर रोहिदास ढोन्नर, रामेश्वर चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते भगवान करवार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
Website Title: Breaking News dheya ladha mahila

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here