Home अकोले गणोरेत सात एकर ऊस जळून खाक, नुकसान भरपाईची मागणी  

गणोरेत सात एकर ऊस जळून खाक, नुकसान भरपाईची मागणी  

Burn seven acres of sugarcane in Ganore

गणोरे | Ganore: अकोले तालुक्यातील पाच शेतकऱ्यांचे ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या आगीत जवळपास सात एकर जळून भस्मसात झाला आहे.

अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सुनील बबन दातीर यांच्यासह त्यांच्या परिसरातील सुरेश बबन दातीर, अंबादास मारुती दातीर, मनोहर महादू काळे, संदीप निवृत्ती दातीर यांच्या मालकीचा ऊस भस्मसात झाला आहे.

उसाच्या शेताच्या शेजारी महावितरण कंपनीची मेन लाईनचा इलेक्ट्रिक पोलचा जंप जळून तुटल्याने आग लागून सात एकर उसाचे नुकसान झाले आहे.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना व संगमनेर साखर कारखाना यांच्या अग्निशमक दलांच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

अनेक इलेक्ट्रिक पोलवरील जम्प व वायर हे खराब झाल्याने अशा घटना घडत आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी महावितरनाणे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर महावितरणने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गणोरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे कामगार तलाठी श्री गोंडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे.  

Web Title: Burn seven acres of sugarcane in Ganore

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here