Home अकोले Akole: तर महावितरण कार्यालयाला ठोकणार टाळे

Akole: तर महावितरण कार्यालयाला ठोकणार टाळे

Akole Statement to MSEDCL on various questions

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाईटच्या विविध प्रश्नावर महावितरण कार्यालयास निवेदन

अकोले: तालुक्यातील लाईटच्या ट्रीपींगचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार-सुरेश नवले (कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले,ता,अकोले जि,अहमदनगर ).

अकोले तालुक्यामधील लाईटच्या विविध प्रश्नांसदर्भात शेतकरी  पुत्रांचे शिष्टमंडळाची अकोले येथील महावितरण कार्यालयावर धडक.ला ईटचे मीनटा-मीनटाला होणारे ट्रीपींग तसेच लॉकडाऊन  काळातील अन्यायग्रस्त विजबील न भरल्यास कनेक्शन कट करण्याची कारवाई त्वरीत थांबवावी. यासाठी आज अकोले महावितरण कार्यालय प्रमुख मा. बागुल साहेब यांच्याबरोबर सवीस्तर चर्चा झाली. जवळ-जवळ दोन तास चाललेल्या या चर्चेत तांत्रिक बाबी शोधून आठ दिवसांच्या आत ट्रीपींग(लाईटचे झटके) थांबवले जातील तसेच वायरमनांचे रीक्त पदे भरुन प्रत्येक फीडरला कायमस्वरुपी वायरमन ऊपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मा. बागुल साहेबांनी दिले. अकोले तालुक्यात लाईटचे कनेक्शन कट केले जाणार नाहीत तसेच कृषी पंपाच्या झीरो पोल जोडण्या तातडीने जोडण्यात येतील या व ईतर सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या सविस्तर चर्चा करुन शिस्टमंडळाने पंधरा दिवसांची मुदत फीक्स करुण सबंधीत मागण्याचे निवेदन देण्यात आले.

तदप्रसंगी मा. श्री सुशांत आरोटे,  सुनिलशेठ पुंडे, शु भमशेठ आंबरे, मा.श्री दीपक तिकांडे ,मा,श्री गिरीशशेठ नाईकवाडी मा.श्री शिवाजी पंढरीनाथ नवले, श्री श्रीकांतशेठ भुजबळ, सुरेशशेठ साबळे, संदीपशेठ नवले, मंगेश मेहर, रमेश खोडके भरत नवले, विशाल नवले, भारत मेंगाळहे व ईतर सर्व शेतकरी पुत्रांनी लाईटच्या विवीध समस्या मांडल्या.

Web Title: Akole Statement to MSEDCL on various questions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here