Home संगमनेर Sangamner: संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर जीप टेम्पोत अपघात

Sangamner: संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर जीप टेम्पोत अपघात

Jeep Tempo Accident on Sangamner on Nashik pune Highway

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे नाशिक पुणे महामार्गावर जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला जोराची धडक बसल्याने जीपमधील असलेले सहा जण जखमी झाले आहेत.

हा अपघात शनिवारी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पुणे महामार्गावर जीपने(एम.एच. १६ ए.जी. ६८९२) प्रवास करत असताना पुण्याच्या दिशेने जात असताना आंबी खालसा फाटा येथे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या टेम्पोला (एम.एच. १२ एन.एक्स. १२५८) या जीपने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. तर प्रवासी बचावले आहे.

या अपघातात चालक अभिजित चंद्रसेन आहेर, मयूर विजय बागुल, तेजस कैलास आहेर, एकनाथ भाऊसाहेब आहेर, प्रीतम बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब रामनाथ आहेर सर्व रा. लोणी ता. रहाता हे जखमी झाले आहे.

Web Title: Jeep Tempo Accident on Sangamner on Nashik Pune Highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here