हत्येचा थरार! प्रेयसीला स्वत:च्या घरी बोलावून केली निर्घृण खून
Breaking News| Murder Case: एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक घटना, तरुणाने आपल्या प्रेयसीला स्वत:च्या घरी बोलावून तिच्यावर प्राणघातक हल्ला.
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीला स्वत:च्या घरी बोलावून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. यात 22 वर्षीय तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही घटना 16 फेब्रुवारीच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास बल्लारपुरातील महाराणा वॉर्डातील सम्यक चौक परिसरात घडली.
रक्षा कुमरे (22 रा. जाकिर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर या प्रकरणातील मारेकरी असलेला आकाश ऊर्फ सिनू दहागावकर (29) हा या घटनेनंतर पसार झाला आहे. या थरारक घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकरणातील संशयित आरोपी आकाश दहागावकर हा नुकताच जेलमधून सुटून आला असल्याचे माहिती समोर आली आहे. तर तो आपली आई रामबाई दहागावकर यांच्या सोबत महाराणा वॉर्डातील सम्यक चौक या भागात राहतो. सिनू गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची ही माहिती समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरी कुणी नसतांना आकाशने रक्षाला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यात प्रेम प्रकरणातून मोठा वाद झाला आणि या वादाचे रूपांतर टोकाला गेले. दरम्यान, आकाशने रक्षाला जबर मारहाण केली आणि घरातील धारदार शस्त्राने रक्षावर वार केले. ज्यामध्ये रक्षाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर मारेकरी आकाशाने घटनास्थळावरून पळ काढला. नंतर उशिरा आकाशाची आई आपल्या कामावरून घरी परतल्या असता त्यांच्या घरात रक्षा कुमरे ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून होती. हे दृश्य बघितल्यानंतर आकाशच्या आईला जबर धक्क बसला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती लगेच परिसरातील लोकांना सांगितली आणि जमलेल्या लोकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील कारवाई सुरू केली.
Web Title: called his girlfriend to his house and committed a brutal murder
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study