Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीवर तरूणाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर.

Repeated abuse of a minor girl

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर (वय १२) तरूणाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नईम मुन्ना खान (वय २६ रा. नईम मोहल्ला, जसपुर, उत्तराखंड, हल्ली रा. दातरंगे मळा, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सदरची घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी नालेगाव परिसरातील भाडोत्री खोलीत घडली आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी मुळची उत्तरप्रदेश राज्यातील असून सध्या नातेवाईकांकडे नालेगाव परिसरात राहत आहे. पीडिता राहत असलेल्या खोलीत नईम खान याने वेळोवेळी पीडितेसोबत बळजबरी अत्याचार केला.

सदरच्या प्रकारानंतर पीडितीने नालेगाव सोडून एका व्यक्तीच्या माध्यमातून संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. दरम्यान सदरची घटना नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडल्यामुळे संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने पीडितेला तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे तिने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार केल्याच्या आरोपावरून नईम खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

Web Title: Repeated abuse of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here