Home अकोले अकोलेमध्ये कडकडीत बंद, टायर जाळून केला निषेध

अकोलेमध्ये कडकडीत बंद, टायर जाळून केला निषेध

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु.

Maratha Reservation Strict lockdown in Akole, protest by burning tyres

अकोले: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाने शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी अकोले बंदची हाक दिली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने, व्यवसाय बंद ठेवले. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संतप्त सकल मराठा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरील कोल्हार घोटी राज्यमार्गावर टायर जाळून निषेध

मराठा योद्धे मनोज जरांगे हे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करीत असून त्यांची प्रकृती खालावली आहे. जर त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर महाराष्ट्र राज्यात मोठा उद्रेक होईल, याची सरकारने दखल घ्यावी. राज्यातील कोणताही आमदार, खासदार, मंत्री यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही, त्यांची घरे जाळली जातील, असा इशारा संतप्त नेते व कार्यकर्त्यांनी दिला. घोषणांनी बसस्थानक परिसर दुमदुमून गेला होता.

Web Title: Maratha Reservation Strict lockdown in Akole, protest by burning tyres

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here