Home Accident News भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली, कारमधील पाच जण….

भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली, कारमधील पाच जण….

Buldana Accident: कारचा अपघात, कार कठडा तोडून थेट नदीत कोसळली.

Car accident, the car broke the cliff and fell directly into the river

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळल्याने अपघात झाला.या कारमध्ये पाच प्रवासी होते. हे सर्व प्रवासी जखमी झालेत. त्यातील तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जालना खामगाव महामार्गावरील जांभोरा पुलावर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यात याच पुलावर अनेकदा अपघात होऊन लोकांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा थरारक अपघात घडल्यामुळे या पुलावरुन प्रवास करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जालना मार्गावर देऊळगाव राजा या गावाजवळ जांभोरा पुलावरुन धावती कार थेट नदीत कोसळली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

MH 20 EY 0488 या क्रमांकाची ही कार होती. या अपघातामध्ये कारच्या समोरच्या बाजूसह मागच्या बाजूलाही जबर फटका बसला. अपघातानंतर कारमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं आणि त्यांची रवानगी तातडीने रुग्णालयात करण्यात आली.

दरम्यान, नेमका हा अपघात कशामुळे घडला, हे कळू शकलेलं नाही. मात्र चालकांचं नियंत्रण सुटल्यानं किंवा चालकाला झोप आली असल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात याच पुलावर सातत्यानं अपघात घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Car accident, the car broke the cliff and fell directly into the river

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here