Home क्राईम तुमच्या मुलासोबत माझं लग्न लावून द्या नाहीतर…तरुणीची प्रियकराच्या आईला धमकी

तुमच्या मुलासोबत माझं लग्न लावून द्या नाहीतर…तरुणीची प्रियकराच्या आईला धमकी

Jalgaon Crime: तरुणाशी प्रेमसंबध, तरुणी थेट प्रियकराच्या घरी, प्रियकराच्या आईला लग्न करून द्या नाहीतर आत्मदहन करण्याचा (Threat) इशारा दिला.

Marry me with your son or else...Threat of young woman to boyfriend's

जळगाव: प्रेमप्रकरणात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येताना दिसतात.  आपल्या प्रियकरासोबत लग्न करून द्यावे, असे म्हणत एका तरुणीने सिनेस्टाइल प्रकारे थेट प्रियकराच्या घरी जात धिंगाणा घातल्याची घटना भडगाव तालुक्यातील एका गावात घडली. तरुणाशी माझे लग्न करून द्या, असे सांगून तरुणाची आई आणि वहिनीलाही तरुणीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावातील तरुणीचे संबंधित तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरुणाशी लावून द्या, अशी मागणी करत तरुणाच्या घरात घसून तरुणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या करून घेईन, अशी धमकी तरुणीने मुलाच्या नातेवाईकांना दिली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.

Web Title: Marry me with your son or else…Threat of young woman to boyfriend’s

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here