Home क्राईम संगमनेर: गोडावून फोडून तीन लाखांची चोरी- Theft

संगमनेर: गोडावून फोडून तीन लाखांची चोरी- Theft

Ahmednagar Sangamner Theft:  अज्ञात चोरट्यांनी एका गोडावूनचे पत्रे उचकटून आतील सुमारे दोन लाख ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

Theft of three lakhs by breaking and entering

संगमनेर: शहरानजीक असणाऱ्या संगमनेर खुर्द परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका गोडावूनचे पत्रे उचकटून आतील सुमारे दोन लाख ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. आहे.

याबाबत माहिती अशी की, सुभाष बाबुराव कर्पे यांचे संगमनेर खुर्द येथे गोडावून आहे. रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दिवसभराचे कामकाज आटोपून गोडावून बंद करून घरी गेले. मात्र पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या गोडावून चे पत्रे तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी आतील सुमारे दोन लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्दे मालाची चोरी केली. कर्पे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

दरम्यान शहर व तालुक्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहर व तालुका पोलीस स्टेशनला अद्याप नविन पोलीस निरीक्षक मिळालेला नाही. यामुळे नागरिक खंत व्यक्त करत आहे.

Web Title: Theft of three lakhs by breaking and entering

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here