Ahmednagar Sina River Flood: पुलावरून जाणारी कारही वाहून गेली.
अहमदनगर: राज्यात सर्व ठिकाणी मुसळधार पाउस झाला. मंगळवारी सायंकाळी नगर तालुक्यात मुसळधार पाउस झाला. त्यामुळे सीना नदीला पूर आला. तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे सीना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने गावातील पूल वाहून गेला. यावेळी पुलावरून जाणारी कारही वाहून गेली. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून वेळीच उडी मारल्याने तो बचावला.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहरासह, उपनगरातील अनेक भागात पाणीपाणी झाले होते. अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले होते. यामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसाने शहरातील रस्त्यांवर झालेल्या डागडुजीला पुन्हा उघडे पाडले आहे. अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पिंपळगाव माळवी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पिंपळगाव माळवी गावातील अमरधाम शेजारील सीना नदीचा पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील सरपंच संजय प्रभुणे त्यांच्याकडे आलेले पाहुणे प्रणित पीटर जाधव (रा. पुणे) यांची कार नंबर एमएच 12 बीव्ही 7620 ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. शोध घेतल्यानंतर गाडी सागर गुंड यांचे शेताजवळ आढळून आली. कार क्रेनच्या मदतीने बुधवारी बाहेर काढण्यात आली.
Web Title: car along with the bridge was washed away in the river flood