Rajur: घोरपडा देवी मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांना राजूर पोलिसांनी जेरबंद (Arrested).
राजूर: अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणारे रंधा धबधबा येथील घोरपडा देवी मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांना राजूर पोलिसांनी जेरबंद केल्याची कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की, घोरपडा देवी मंदिराच्या प्रवेशव्दाराला असलेले कुलुप तोडुन देवीचे मंदिराचे गाभाऱ्यात असलेली दानपेटी व दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती दि.07/09/2022 रोजी फिर्यादी विजय विठ्ठल येडे, वय 27 वर्षे,रा.रंधा, ता.अकोले जि.अहमदनगर यांनी फिर्याद दिली यावरून जुर पोलीस स्टेशनला गु.र.नं.I 194/2022 भा.द.वी.कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तांत्रीक तपास करुन नमुद तीन आरोपी निष्पन्न केले. युवराज मुरलीधर येडे, वय- 39 वर्षे, रा. रणद खुर्द, ता. अकोले विशाल बारकु चव्हाण,वय-20 वर्षे, सध्या रा. रणद खुर्द, ता. अकोले, मुळ रा. टाकेद बु॥, ता. इगतपुरी, जि. नाशिक विधीसंघर्शीत बालक, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदर आरोपी यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.
सदर आरोपींकडुन चोरी गेलेली दानपेटी व रक्कम हस्तगत केली आहे. सदर गुन्ह्यात आरोपी यांस अटक केली असुन पुढील तपास दिलीप डगळे करत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधिक्षक अहमदनगर,मा.श्रीमती स्वाती भोर मँडम,अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. राहुल मदने सो.उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व अंमलदार-पो. फुरकान शेख, नेम.अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, श्रीरामपुर, पो.डगळे, पो.काँ अशोक गाढे, पो.काँ. अशोक काळे, चा.पो.ना. पांडुरंग पटेकर यांनी केला आहे.
Web Title: Theft who stole donation box of Ghorpada Devi temple in Randha Arrested