Home अहमदनगर कार व दुचाकी अपघात; बंधाऱ्यात पडल्याने बुडून एकाचा मृत्यू

कार व दुचाकी अपघात; बंधाऱ्यात पडल्याने बुडून एकाचा मृत्यू

Ahmednagar News:  कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर  अपघात, दुचाकीवरील दोघे पाण्यात पडले, एकाचा मृत्यू.

Car and bike accident One died due to drowning after falling

कोपरगाव:  तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यावरील अरुंद रस्त्यावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे पाण्यात पडले. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजेच्या  सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम बाबूराव आहेर (वय ५०, रा. धारणगाव, ता. कोपरगाव) व बाळासाहेब यशवंत रणशूर (वय ५६, रा. मुर्शतपूर, ता. कोपरगाव) हे दोघे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हिंगणी येथून मुर्शतपूरकडे येत होते. हिंगणी बंधाऱ्यावरून येत असताना अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात आहेर व रणशूर दोघे बंधाऱ्यातील पाण्यात पडले. स्थानिक मच्छीमार व नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. शांताराम आहेर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Car and bike accident One died due to drowning after falling

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here