Home Ahmednagar Live News अहमदनगर: 10 हजारांची लाच; पोलीस अंमलदार जेरबंद

अहमदनगर: 10 हजारांची लाच; पोलीस अंमलदार जेरबंद

Ahmednagar  News:   तक्रार किरकोळ सुरूवात घेऊन प्रकरण मिटवून घेण्याच्या मोबदल्यात पोलीस अंमलदाराने 30 हजार रुपयांची लाच (Bribe) मागणी.

Ahmednagar Bribe of 10 thousand Police officer Arrested

अहमदनगर: विरोधी गटाकडून दिली जाणारी तक्रार किरकोळ सुरूवात घेऊन प्रकरण मिटवून घेण्याच्या मोबदल्यात पोलीस अंमलदाराने 30 हजार रुपयांची लाच मागणी करून 10 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नंदलाल मुरलीधर खैरे असे पोलीस अंमलदाराचे आहे.

येथील लाचलुचपत विभागाने अंमलदार खैरे विरोधात बुधवारी (दि. 11) गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील तक्रारदार यांच्या कुटुंबाचे शेजारी राहणार्‍या कुटुंबासोबत कचरा गोळा करून पेटवून देण्याच्या कारणावरून 10 जुलै रोजी वाद झाला होता. सदर वादात तक्रारदार यांची भावजयी किरकोळ जखमी झाली होती म्हणून तक्रारदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास अंमलदार खैरे करत होते. ते तक्रारदार यांच्या घरी पंचनामा करण्याकरिता गेले होते. त्यावेळी अंमलदार खैरे यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमचे शेजारी हे तुमच्यासह भावाविरूध्द विनयभंगाची तक्रार देणार आहे.

विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवून घेण्याच्या मोबदल्यात खैरे याने 30 हजार रुपये लाच मागणी केल्याची तक्रार येथील लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने 26 जुलै रोजी लाच मागणी पडताळणी केली असता अंमलदार खैरे याने तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी करून 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. म्हणून अंमलदार खैरे याच्याविरूध्द बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संतोष शिंदे, विजय गंगुल, रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, हारूण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Ahmednagar Bribe of 10 thousand Police officer Arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here