Home क्राईम अचानक पोलिसांची धाड: ७ बांगलादेशी महिलांना अटक

अचानक पोलिसांची धाड: ७ बांगलादेशी महिलांना अटक

Pune Crime News:  कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर पीटाअंतर्गत गुन्हा दाखल.

Crime under PETA against the woman running the Prostitution

पुणे: पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारपेठ परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक तसेच महिला अवैध पद्धतीने वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी सकाळच्या सुमारास बुधवारपेठेत धाड टाकली.

अचानक पोलीस धडकताच बुधवार पेठेत अवैधरित्या वास्तव करणाऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी छापेमारी करत सात बांगलादेशी महिलांना अटक केली. या महिलांकडे भारतात येण्याचा पुरावा नसल्याचं तपासात उघड झालं आहे.

याप्रकरणी बुधवार पेठेतील कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेलाही सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बुधवारपेठ परिसरात या बांगलादेशी महिला राहत होत्या. यातील बहुतांश महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होते.

ही बाब सामाजिक सुरक्षा दलाच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने बुधवारपेठेत धडक मारली. बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्याची सामाजिक सुरक्षा दलाची ही महिनाभरातील तिसरी कारवाई आहे. यापूर्वी देखील पथकाने बुधवारपेठेत धडक मारत काही बांग्लादेशी महिलांना अटक केली होती. याप्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर पीटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime under PETA against the woman running the Prostitution

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here