Home Ahmednagar Live News युपी येथील बनावट बियाणाचा ट्रक पकडला, फसवणुकीचा गुन्हा दाखल

युपी येथील बनावट बियाणाचा ट्रक पकडला, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Caught a fake seed truck in UP crime filed

पारनेर | Crime: तालुक्यात विक्रीसाठी आणण्यात आलेले सहा लाख रुपये किमतीची सहा टन हिरव्या वटाण्याचे बियाणे कृषी विभागाच्या पथकाने पकडले आहे. कृषी विभागचे गुणनियंत्रक किरण मांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी पटेल सीड्स कॉर्पोरेशन, उत्तरप्रदेश या बियाणे कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन चालकांना ताब्यात घेतले आहे.

३ जून सायंकाळी सात वाजता पंचायत समितीचे कृषी अधिकारी बळीबा उघडे यांना पारनेर बस स्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बियाणाची मोटार संशास्पदरीत्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक चौकात पोहोचले असता तेथे युपी ९२ टी ८१४९ या क्रमांकाची मालमोटार आढळून आली. पथकाने झडती घेतली असता या माल मोटारीत पटेल सीड्स कॉर्पोरेशन कंपनीचे ६ टन बनावट वाटाण्याचे बियाणे आढळून आले. ४० किलो वजनाच्या १५० गोण्यांमध्ये या बनावट वाटाण्याच्या बियाणाची किमत ६ लाख रुपये इतकी आहे. बियाणे निर्मिती कंपनीकडे बियाणे विक्रीचा परवाना नसल्याचे बाब पथकाच्या निदर्शनास आली. बोगस बियाणे वाहतूक करणारा ट्रक पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. कृषी विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून पोलिसांच्या स्वाधीन केले असून चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले.   

Web Title: Caught a fake seed truck in UP crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here