Home संगमनेर संगमनेरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना पकडले

संगमनेरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना पकडले

Breaking News | Sangamner: ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा.

Caught illegally refilling gas in Sangamner

संगमनेर: शहरातील गुडलक ग्लास हाऊसमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास छापा टाकून ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील गुडलक ग्लास हाऊसमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना समजली होती. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने छापा टाकला असता आठ हजार रुपयांच्या दोन सिलिंडर व नऊशे रुपयांच्या पाच किलोच्या दोन छोट्या सिलिंडर जप्त केल्या.

याप्रकरणी पोकॉ. राहुल सारबंदे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन रियाज अब्बाज पठाण (वय ३४, रा. सुकेवाडी रोड, संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव करत आहेत.

Web Title: Caught illegally refilling gas in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here