Home संगमनेर  संगमनेरात बनावट गॅस रेग्युलेटर विक्री, ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त

 संगमनेरात बनावट गॅस रेग्युलेटर विक्री, ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त

Breaking News | Sangamner: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा मारून ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त.

Sale of fake gas regulators in Sangamner

संगमनेर: शहरातील सय्यद बाबा चौक येथील भारत स्टील दुकानावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा मारून ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त केले आहे.

याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शनिवार दि.१७ फेब्रुवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. दुकानदाराने या ग्राहकास बनावट कंपनीचे गॅस रेग्युलेटर विक्री केले. त्यानुसार पथकाने छापा टाकून झडती घेतली असता ९० बनावट गॅस रेग्युलेटर मिळून आले. त्यात पिवळ्या रंगाचे भारत कंपनी असे नाव असणारे १६ बनावट गॅस रेग्युलेटर, निळ्या रंगाचे एचपी असे नाव असणारे १४ बनावट गॅस रेग्युलेटर, राखाडी रंगाचे सेफ गॅस असे नाव असणारे ६० बनावट गॅस रेग्युलेटर यांचा समावेश आहे.

याप्रकरणी रैय्यान शेरखान पठाण याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. दरम्यान, दुकान मालकाकडे गॅस रेग्युलेटर विक्रीचा कोणताही परवाना नाही. बनावट गॅस रेग्युलेटर विक्रीतून बेकायदेशीररित्या आर्थिक फायदा घेत असून शेकडो नागरिकांचे आयुष्य तो धोक्यात आणत असल्याचे समोर आले आहे. त्याने हे बनावट रेग्युलेटर कोठून आणले, यापूर्वी शहरात किती बनावट गॅस रेग्युलेटर विक्री केले याचा तपासही पोलीस करत आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस नाईक राहुल डोके, राहुल सारबंदे यांनी केली आहे.

Web Title: Sale of fake gas regulators in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here