Home महाराष्ट्र ई-पास रद्द केल्यानंतर राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरु, बुकिंग उद्यापासून सुरु

ई-पास रद्द केल्यानंतर राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरु, बुकिंग उद्यापासून सुरु

Central railway Inter-state journey started

मुंबई: लॉकडाऊन शिथिलकरण चौथ्या टप्प्यात राज्यातील जिल्हा प्रवास करण्यासाठी ई- पास सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांनतर आता मध्य रेल्वेने राज्य अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्य अंतर्गत रेल्वे बुकिंग २ सप्टेंबर २०२० पासून सुरु होणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने एक पत्रक जारी केले आहे.

आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्य अंतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरु होणार असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना राज्य अंतर्गत प्रवासासाठी उद्यापासून तिकीट बुकिंग करता येणार आहे असेही मध्य रेल्वेने म्हंटले आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. नागरिकांची नाराजी लक्षात घेता ई पास सेवा रद्द करण्यात आली आहे. मागील पाच महिने ई पास सक्तीची होती. केंद्राने ७ सप्टेंबर पासून मेट्रो सुविधा सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यात अजून एक महिनाभर मेट्रो बंदच राहणार आहे.

Web Title: Central railway Inter-state journey started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here