Home महाराष्ट्र ब्रेकिंग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मोठा दणका

ब्रेकिंग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मोठा दणका

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी मार्च ते जून 2022 मध्ये बारामतीत मंजूर झालेल्या नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती.

Chief Minister Eknath Shinde's big blow to Ajit Pawar

मुंबई: राज्यात सध्या एकनाथ शिंदे व फडवणीस यांच सरकार आहे. कामकाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहिलं जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विकासकामांच्या बाबत मुख्यमंत्री शिंदेंकडून निर्णय घेतले जात आहेत. त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मार्च ते जून 2022 मध्ये बारामतीत मंजूर झालेल्या नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी एकीकडे बारामतीतील कामांना स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंकडून सत्तेत आल्यावर पवारांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली जात आहे.

Web Title: Chief Minister Eknath Shinde’s big blow to Ajit Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here