Home जळगाव रेल्वेलाईन ओलांडताना राजधानी एक्स्प्रेसखाली महिलेचा मृत्यू

रेल्वेलाईन ओलांडताना राजधानी एक्स्प्रेसखाली महिलेचा मृत्यू

Ralway Accident : थरकाप उडविणारी घटना, क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

Accident Woman dies under Rajdhani Express while crossing railway line

पाचोरा | जळगाव: पाचोरा रेल्वेस्थानकावर उतरविल्यावर रेल्वे लाईन ओलांडताना राजधानी एक्स्प्रेसखाली आल्याने  महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०:३० वाजता घडली. यावेळी महिलेसोबत असलेल्या नातलगांचा काळजाचा ठोका चुकला.

सुनिता सुरेश पाटील (वय ४१) असे मृत महिलेचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी सुनिता या जेठाण्यांसह पुणे येथे राहत असलेल्या असलेल्या नणंदच्या ओटी भरण्याच्‍या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. ओटी भरण्याचा कार्यक्रम आटोपून चारही जण १६ जुलैच्‍या रात्री ११ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसने (११०३९) पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्या.

दरम्यान आज (१७ जुलै) सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी महाराष्ट्र एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर आली. एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या महिला राखीव जनरल डब्यात बसलेल्या तीन जेठाण्या व सुनिता पाटील ह्या प्लॅटफार्मवर उतरल्या. यानंतर दादरा चढून न जाता एक्सप्रेसच्या मागुन अप लाईन क्रॉस करुन जात होत्‍या. तीनही जावा ह्या दुसऱ्या साईडच्या अपसाईडच्या प्लॅटफार्मवर चढल्या. परंतु सुनिता पाटील यांच्याकडे बॅगांचे ओझे होते. याच वेळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस (२२२२२) ही भरधाव वेगाने आली. सुनिता पाटील यांच्या लक्षात येताच त्यांची तारांबळ उडाली. एक्सप्रेसच्या लोकोपायलटने हॉर्न वाजविला. तसेच गाडी हळु करण्यासाठी ब्रेक देखील दाबला. मात्र सुसाट वेगाने येत असलेली एक्सप्रेसच्‍या लोकोपायलट यांचा प्रयत्न व्यर्थ ठरले आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. सुनिता पाटील यांना चिरडून राजधानी एक्सप्रेस धडधडत पुढे गेली. याप्रकरणी  लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Accident Woman dies under Rajdhani Express while crossing railway line

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here