Home अहमदनगर भाड्याच्या खोलीत ठेऊन मुलीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना सक्तमजुरी

भाड्याच्या खोलीत ठेऊन मुलीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना सक्तमजुरी

Karjat News: भाड्याच्या खोलीत ठेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार (abused) केला.

accused in the case of abducting and abused the girl

कर्जत: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी तीन आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायालयाने सक्तमजुरीसह कैदेची शिक्षा सुनावली आहे. १ जून २०२१ रोजी हा प्रकार घडला होता.

फिरोज चाँद मुलाणी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव सर्व राहणार दुरगाव (ता.कर्जत) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. कर्जत न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

तालुक्यातील दूरगाव येथील अल्पवयीन पीडितेला फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन तिला बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता. या प्रकरणात आरोपीला मुलगी पळवून नेण्यासाठी टेम्पो गाडी उपलब्ध करून पळवून नेण्यासाठी मदत केली होती. याबाबत महिला फिर्यादी यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीवरून मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य आरोपी मुलाणी यावर 376 (2) (एन) अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद. तसेच कलम 363 अन्वये 3 वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे तर त्याला मदत करणारे आरोपी ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव यांच्यावर भादव कलम 363 अन्वये 3 वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Web Title: accused in the case of abducting and abused the girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here