Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर ब्रेकिंग: विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Ahmednagar Dead body Found: विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात जवळच महिलेचे कपडे, मंगळसूत्र आढळून आल्याने हा मृतदेह महिलेचा असावा.

Dead body was found in a scattered state

अहमदनगर: नगर तालुक्यातील वरकड-चास शिवारातील एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात जवळच महिलेचे कपडे, मंगळसूत्र आढळून आल्याने हा मृतदेह महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरलेले असल्याने व काही प्राण्यांनी या मृतदेहाचे लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागेत पडलेला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चास शिवारात महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर आतील डोंगराळ भागात साहेबराव लक्ष्मण गावखरे यांच्या शेतात सुमारे २५ ते ३० गुंठे जागेत मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती तेथील पोलिस पाटील रमेश मुरलीधर रासकर यांनी शनिवारी सकाळी पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, संदीप ढाकणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नगर ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर मृतदेह २५ ते ३० गुंठे मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला.

Web Title: Dead body was found in a scattered state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here