Home Accident News Accident: चार चाकी व दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

Accident: चार चाकी व दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

Shrirampur Accident News:  चार चाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात एक ठार, एक जखमी.

Youth killed in four-wheeler and two-wheeler accident

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव मालुंजा रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील बोरकरवस्तीजवळ वळणावर चार चाकीने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. काल सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात दुचाकीवरील उदय ज्ञानेश्वर पवार हा जागीच ठार झाला तर विजय रामदास गलांडे हा गंभीर जखमी झाला.

पढेगाव ते मालुंजा रस्त्यावर उदय ज्ञानेश्वर पवार (वय 23, रा. माहेगाव, ता. राहुरी) व विजय रामदास गलांडे (वय 22, रा. माहेगाव, ता. राहुरी) हे दुचाकीवरून (क्र. एमएच 17 बीडब्ल्यू 0798) चालले असताना पढेगाव शिवारातील विठ्ठलवाडी येथील बोरकरवस्तीजवळील वळणावर महिन्द्रा व्हिरोटो या चारचाकी गाडीवरील (क्र. एमएच 20 सीएस 2697) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालवून समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली.

या अपघाताबाबत किरण शिवाजी टेकाळे (रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालक दिलीप दत्तात्रय काळे (रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब), 177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री. हबीब हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Youth killed in four-wheeler and two-wheeler accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here