Home अकोले पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला सक्तमजुरी, अकोलेतील घटना

पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला सक्तमजुरी, अकोलेतील घटना

Father Sexyally abused minor Girl: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिच्या बापाला १० वर्षे सक्तमजुरी, पीडित मुलगी गर्भवती असल्याने ती अहमदनगर येथील एका संस्थेत होती.

Forced labor for father who Sexually abused minor girl

संगमनेर : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिच्या बापाला १० वर्षे सक्तमजुरी आणि साठ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एच. मनाठकर यांनी शनिवारी (दि. १६) हा निकाल दिला.

२०१८ ला पीडित अल्पवयीन मुलीने अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बापाने घरातच अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. पीडित मुलगी गर्भवती होते. राहिली. या गुन्ह्याचा तपास राजूर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस उपनिरीक्षक ए. एन. उजागरे यांनी आरोपी विरोधात करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व आर. आर. कदम यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती. सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अॅड. बी.जी. कोल्हे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले होते. या खटल्यात  पीडित मुलगी आणि तिची आई या दोघींनी आरोपीच्या बाजूने बचावासाठी साक्ष दिली होती. परंतु पीडित मुलगी गर्भवती असल्याने ती अहमदनगर येथील एका संस्थेत होती. तिने खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता. बाळाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला होता.

दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस कॉस्टेबल स्वाती नाईकवाडी यांनी काम पाहिले.

तीन डॉक्टरांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली

बाळाचे पालकत्व सिद्ध होण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक कादरी यांनी बाळाचे हाड डीएनएसाठी राखून ठेवण्यास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले होते. राखून ठेवलेले पायाचे हाड, पीडित मुलगी व आरोपी यांच्या रक्ताचे नमुने हे देखील राखून ठेवले होते. या सर्व गोष्टी नाशिक येथील रासायनिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले. त्याबाबत डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला. न्यायालयात तीन डॉक्टरांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार, व्यक्तीला शिक्षा ठोठावण्यात आली.

Web Title: Forced labor for father who Sexually abused minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here