Home अहमदनगर राहुरी: पोलीस दरोडेखोर यांच्यात सिनेस्टाईल थरार, पोलीस उपनिरीक्षकावर सतुरने हल्ला

राहुरी: पोलीस दरोडेखोर यांच्यात सिनेस्टाईल थरार, पोलीस उपनिरीक्षकावर सतुरने हल्ला

Cinestyle tremor among police robbers, Satur attack on police sub-inspector 

Ahmednagar | Rahuri | राहुरी: राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलीस पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी हजर झाले. पोलिसांना पाहून सुसाट सुटलेल्या दरोडेखोरांना पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नाशिक येथील दोघांना पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. तिघे जण अंधारचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. दोघांना शिर्डी येथून पकडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे.

राहुरी शहरातील मल्हारवाडी येथे पोलीस व दरोडेखोर यांच्यात सिनेस्टाईल थरार रंगला होता. शनिवारी पहाटे काही दरोडेखोर राहुरी शहरामध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे ३ वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे. पोलीस उप निरीक्षक नीरज बोकील हे पथकासह मल्हारवाडी रस्ता परिसरातील सातपीर दर्गाजवळ आले. त्यावेळी आवाज येत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता काही जण पळू लागले. पाठलाग केल्यानंतर पोलिसांच्या हाती मयूर राजू ढगे व ईश्वर अशोक मोरे रा. नाशिक हे सापडले. तर रणजीत केशव कांबळे, अजय पवार, रमेश वाकोडे सर्व रा. निफाड हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. पकडलेला आरोपी मयूर ढगे याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर सत्तूरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करीत आहे.

Web Title: Cinestyle tremor among police robbers, Satur attack on police sub-inspector 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here