Home चंद्रपूर Accident | महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू, आईच्या मायेला २ मुले मुकणार

Accident | महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू, आईच्या मायेला २ मुले मुकणार

Accident death of a female police officer

Chandrapur | चंद्रपूर : मेश्राम यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात (Accident) झाला. राजुरा येथे मुख्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस मोनल मेश्राम यांचा मृत्यू (death) झाला आहे. या घटनेने राजुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस मोनल या आपले कर्तव्य बजावून मायस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर येथून राजुराकडे आपल्या राहत्या घरी येत होत्या. मात्र वाटेत मागून येणाऱ्या आयशर ट्रकने मोनल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच मोनल यांचा आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळून मोनल यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती समजताच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक मोनल मेश्राम यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर आणि मुले आहेत. मोनल यांच्या अकाली निधनाने त्यांची दोन लहान मुले आईच्या मायेला मुकणार आहेत.

Web Title: Accident death of a female police officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here