Home पुणे इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मायलेकराचा मृत्यू, दुर्दैवी घटना

इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मायलेकराचा मृत्यू, दुर्दैवी घटना

Milekar dies after drowning in Indrayani river

Pune  | वडगाव मावळ: वडगाव मावळ नायगाव गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून (drowning) माय लेकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

पूनम दिनेश शिंदे वय ३८ आणि युवराज दिनेश शिंदे वय १४ या दोघांचा मृत्यू झाला आहे. कामशेत येथे हे राहत होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आई व मुलगा इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. यावेळी युवराज हा पाण्यात पडला त्याला वाचविण्यासाठी आई पूनमने पाण्यात उडी मारली. दोघेही पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांना पूनमचा भाऊ अक्षय टाकावे व दाजी विजय यांनी त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

Web Title: Milekar dies after drowning in Indrayani river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here