Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या राहुरी फॅक्टरी येथील माध्यमिक विद्यालयात बंद वर्गात विद्यार्थीनींची आंतरवस्त्रे व कंडोमची पाकिटे (Condom) आढळून आल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या बंद असलेल्या वर्गाचे कुलूप तोडून वर्गात काही अनैतिक प्रकार घडतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवार दि. 3 जून रोजी काही पालक आपल्या पाल्यांना मिळणाऱ्या मोफत धान्य आणण्यासाठी गेले होते. त्यातील काही पालकांना शाळेच्या एका वर्गाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. पालकांनी आत डोकावून बघितले असता आतमध्ये मुलींचे आंतरवस्त्र व कंडोमची पाकिटे आढळून आली.
यावेळी शांतीचौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन यांनी आपल्या सहकार्यांसमवेत वर्गात जाऊन पाहणी केली. त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांना बोलावून त्यांच्याही निदर्शनास त्या वस्तू आणून दिल्या. यावर मुख्याध्यापकांनी हा वर्ग बऱ्याच दिवसांपासून बंदच होता. असे सांगून या वर्गाचे दार तातडीने बंद करणार असल्याचे सांगितले. तर शाळेच्या वर्गाकडे आणि स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केल्याची कबुली दिली. याबाबत संबंधित शिक्षण मंडळांच्या पदाधिकार्यांनाही ही घटना सांगण्यात आली आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून या घटनेला पायबंद घालण्याची मागणी पालकांनी केली आहे.
Web Title: Rahuri parents over the discovery of underwear and condom packets in the classroom