Home पुणे Accident: पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

Accident: पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

Five members of a family were killed in a tragic accident

पुणे: पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघातात (Accident) जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवार दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कासेगाव नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात कारमधील चालक अरिंजय आण्णासो शिरोटे रा. जयसिंगपूर, यांच्यासह एक महिला स्मिता अभिनंदन शिरोटे (वय ३८) व तीन मुले पूर्वा अभिनंदन शिरोटे (वय १४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (वय ०९), वीरेन अभिनंदन शिरोटे (वय ०४) हे मृत झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, येवलेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शर्यत जवळ आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ ए एम ३६४४) थांबलेला होता, मात्र कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १४ डी एन ६३३९) उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. यामध्ये वरील सर्वजण गंभीर जखमी झाले.  यामधील तिघांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे तर दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Five members of a family were killed in a tragic accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here