Raid: संगमनेरात कत्तलखाण्यावर शहर पोलिसांचा छापा
संगमनेर | Sangamner: संगमनेरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापा (Raid) टाकून 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व एक मालट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 45 हजार रुपये किमतीचे 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व 2 लाख रुपये किमतीचा मालट्रक क्रमांक एम. एच. 12 एस. एक्स 4543 असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौसीफ ताहीर कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर), गुलाम फरीद कुरेशी (रा. मोगलपुरा, संगमनेर, समोशीद्दीन कुरेशी (रा. संगमनेर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करत आहेत.
Web Title: City police raid a slaughterhouse in Sangamner