Home Accident News संगमनेर: कार व पिकअप यांचा समोरा-समोर अपघात, एक जण ठार

संगमनेर: कार व पिकअप यांचा समोरा-समोर अपघात, एक जण ठार

Accident One killed in car-pickup collision

संगमनेर | घारगाव: नगर-कल्याण महामार्गावर आळेगावच्या शिवारात लवणवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास कार व पिकअप यांच्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरा-समोर अपघात (Accident) झाला. या अपघातात प्रवीणकुमार नवनाथ आहेर (रा. पळसपूर, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास सिद्धांत बाळासाहेब खंडागळे (रा. हसनापूर, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) हा त्याच्या ताब्यातील पिकअप एम. एच 16 सी. डी 0910 भरधाव वेगात आळेफाट्याच्या दिशेने घेऊन जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या सेलेरो एम. एच 46 बी. ई 0657 हिला जोराची धडक दिली. अपघात इतका जोराचा होता की, सेलेरो कारमधील चालक प्रवीण आहेर याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी संतोष नवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून अपघात घडवून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालक सिद्धांत खंडागळे विरुद्ध आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रफिक तडवी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Accident One killed in car-pickup collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here