नववीतील मुलाचा 3 वर्षीय मुलीवर अत्याचार, गुन्ह्याची कबुलीही
Breaking News | Mumbai Crime: एका 16 वर्षीय मुलाने 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार (abused) केल्याचं समोर आलं.
मुंबई : मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 16 वर्षीय मुलाने 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. घटना साकीनाका भागात घडली आहे.
मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू असून तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्को अंतर्गत तक्रार दाखली केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत आहे. पीडित मुलीचं कुटुंब साधारण 15 दिवसांपूर्वी सोलापूरमधून मुंबईत आलं आहे. पीडित मुलीची आवश्यक आरोग्य तपासणी राजवाडी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
पीडित मुलीच्या आरोग्य तपासणीनंतर आणि पोलीस तपासानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. मात्र, घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Class IX boy molested 3-year-old girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study